पक्षीही वळू लागलेत घरट्याकडे
दिसाचा प्रकाश तो मंद झाल्यावर
केवढा गोतावळा दिसे चंद्र रातीला
किरणेही पडती तो धुंद झाल्यावर
दिव्याचाही प्रकाश लख्ख जीवनी
तिमिर पसरला तो बंद झाल्यावर
वाराही.. माझ्याशी लपंडाव खेळतो
तिच्या स्पर्शाने तो बेधुंद झाल्यावर
ओठी असलेले कागदावर उमटले
शब्दात वावरलो तो छंद झाल्यावर
© कमलेश सोनकुसळे