काव्यप्रकार- *त्रिवेणी*.
(कार्यशाळा)
♦️नियम:
♦️१) *पहिल्या ओळीत* .. *तीन शब्द*
*दुसऱ्या ओळीत* .. *तीन शब्द*
**तीसऱ्या ओळीत* .. *तीन शब्द*
*पहील्या आणि तिसऱ्या ओळीत
* यमक साधावे* .( स्वर यमक साधणे आवश्यक)
* हा साधा सोपा नियम आहे..
* ( काही ठिकाणी..कधी कोणी पहिल्या व दुस-या ओळीत यमक साधतात..पण हे जास्त आकर्षक वाटत नाही.)
* ♦️पहिल्या व तिसऱ्या ओळीतच यमक साधा.
* ♦️२) त्रिवेणी काव्यप्रकारात पहिल्या दोन ओळीत एक विचार मांडला जातो आणि तिसरी ओळ कधी पहिल्या दोन ओळींच्या अर्थामध्ये भर घालते तर कधी त्यांना वेगळा दृष्टीकोन देते.
* ♦️३)काही ठिकाणी..पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत तीन शब्द असतात. (पहिल्या आणि तिसऱ्या ओळीत शब्द तेवढेच असतात.)
* मात्र दुसऱ्या ओळीत रचना लयबद्ध आणि अर्थ पूर्ण होईल इतकेच शब्द असतात). (हे फक्त माहीतीसाठीच सांगितले)
* ♦️आपण तीन्ही ओळीत तीन शब्दच घेणार आहोत. म्हणजे आकृतीबंध छान दिसतो आणि त्रिवेणी रचनेत स्वर/ उच्चार यमक वापरणे आवश्यक आहे
उदा.
चला करुया पावभाजी
तयारी करून आधी
करूया रसरशीत भाजी
उपक्रमासाठी शुभेच्छा 💐
सौ.सुधा जाधव
प्रशासक
(शब्दवेड साहित्य समूह)
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁