"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

जात

 जात (गझल)


वृत्त - आनंदकंद 

(गागाल गालगागा गागाल गालगागा) 


तो लाल रंग माझा, बोलून  जात गेली

रंगात  माणसाला,  सोडून  जात गेली


झालेत राजकारण, शेतीत बांधवांच्या

वादात  भावनांना,  फोडून जात गेली


आधीच बंड होते, रक्तामध्येच त्यांच्या

रे कोणते  गळे ते,  कापून जात  गेली


शब्दात शोधले मी,काव्यात रे कितीदा

माझ्यासवे  तुला रे,  टाळून जात गेली


मागू कसे  सखे गं,  तारे  अता नभीचे

शिंपून  तारका या,  रंगून  जात  गेली


झाला उजेड सारा,का पेटल्यात वाती 

माळूनि  द्वेष  तेव्हा,  पेटून जात गेली


नाहीच जात माझी,आधी कुणा कळाली 

झेंड्यास  रंग माझ्या,  लावून जात गेली


घेऊन  संकटे  रे,  अंधार  ठाकला  हा

तेवून काजव्यांना,  जाळून जात गेली


बंदिस्त जीवनी या, झालेत मरण सोपे

जातीस  शेवटाला,  सांधून  जात गेली


© कमलेश सोनकुसळे, काटोल