"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

गगनफुल



जीवनातील प्रेमाच्या क्षणाचा लोप झालेला आहे
प्रत्येकजण माझ्यावर आज नाराज वाटत आहे

तारंगणातील तारका अस्ताला गेलेल्या आहे 

आता तर विभावरी सुद्धा भयानक रात्र वाटत आहे

हृदयामध्ये वियोजन्य दुःखाचे वास्तव आहे 

आता तर रजनीकर सुद्धा कलंकित वाटत आहे

तुझी सावली माझ्यापासून दूर जाणार आहे

आता तर रमणी सुद्धा गजगामिनी वाटत आहे 

कधीपर्यंत श्वासाचे ओझे मी उचलणार ?

आता तर जीवन सुद्धा भ्रामक वाटत आहे 

रजनी गेल्यानंतर रवी प्रकट होणार आहे

आता तर प्रकाश सुद्धा तिमिर वाटत आहे 

कळी उमलून केव्हातरी फुल होणार आहे 

आता तर मिलन सुद्धा विरह वाटत आहे

अतित प्रणयाचे क्षण मी आठवणार आहे 

आता तर क्षतज सुद्धा उदक वाटत आहे

माझे भविष्यातील स्वप्न लयाला जात आहे

आता तर प्रीती सुद्धा असूया वाटत आहे 

जीवनातील प्रत्येक क्षण अख्यायिका बनलेली आहे

आता तर माझी कविता सुद्धा गगनफुल वाटत आहे

कमलेश तुकाराम सोनकुसळे

काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com