"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

आवर्तन

 आवर्तन


भावनांनी पंख माझे  छाटले खूपदा

डोळ्यांत आसवे माझे दाटले खूपदा


पाहिली आवर्तनात  वाट रे क्षणांच्या 

नाते  जन्मांतराचे  हे   टाचले खूपदा


कोणती जखम अशी ओली रक्ताविना?

कापला  केसाने  गळा   वाटले खूपदा


नाहीच विश्वास बघा राहिला नात्यांचा

दुःखाने  मला रे गड्या  गाठले खूपदा


मौन  पाळले दुःखात   कटाक्षाने सदा

हृदयात  हुंदके  जरी    साठले खूपदा


मांडू कशी शब्दात रे माझी हीच व्यथा

पान   कवितेचे  तसे     फाटले खूपदा


© कमलेश सोनकुसळे, काटोल