तुझी अभिलाषा
असून सुद्धा,
माझ्याशी तू
बोलणार नाही...
कितीही केले
प्रयत्न तरी,
मी प्रवाहपतित
होणार नाही...
माझा निर्णय
ठाम आहे,
ठाम आहे,
निर्णयाविरुध्द मी
जाणार नाही...
मयंक माथी
डाग जरी,
तुजला कलंकित
करणार नाही...
कितीही कृतक
बोलली मला,
बोलली मला,
प्रेमात दुरावा
करणार नाही...
मनात असूया
बाळगली तरी,
धरसोड नात्याची
करणार नाही...
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
काटोल, नागपूर 7588691372
www.kamlesh1029.blogspot.in