
मनं पाखरु झालंया
( चाल - सैराट - झिंग झिंग झिंगाट...)
बागेत होतंय सळ सळ लाली फुलावर आली,
आन पानं गळतंय सारं ही वाऱ्याची बाधा झाली,
आता स्वैर झालंया, मन बेचैन झालंया,
अन तुझ्याचसाठी माझं मन पाखरू झालंया,
धडधड उरात, गातंय प्रेमात, प्रितीत आलोया
झालं पिंग पिंग, पिंग पिंग, पिंग पिंग पिंगाट...1
आता विरहात आलो, माझं नशीब चांगलं,
आठवूनी तुला, तुझं वेडचं लागलं,
आता पळत आलंया, मनं उडत आलंया,
अन तुझ्याचसाठी माझं मनं पाखरू झालंया,
प्रेमाच्या धुंदीत, समद्या बागेत, रंग उधळत आलोया,
झालं पिंग पिंग, पिंग पिंग, पिंग पिंग पिंगाट...2
समद्या बागेला झालीया, तुला भेटण्याची घाई,
कधी भेटशील, म्हणे आता, जाई अन जुई
आता फितूर झालंया, मन काहुर झालंया,
अन तुझ्याचसाठी माझं मन पाखरू झालंया,
अन ढिंच्याक नाचत, सुगंध वेचत, भेटाया आलोया,
झालं पिंग पिंग, पिंग पिंग, पिंग पिंग पिंगाट...3
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com