सांज
सूर्य अजून ढगांच्या आड... प्रकाशाची तिरीप आहे
गाय हंबरुण व्याकुळली... वासरे ती समीप आहे
उजेडाने घेता कलाटणी... दिवास्वप्ने बरीच आहे
पाखरे बघती घरट्यांत... दाटले ते क्षितिज आहे
ओशाळल्या दाही दिशा... दडला हा तिमिर आहे
चोचीत चारा घेऊन पक्षी... पिलांसाठी अधीर आहे
अंधाराची धावपळ आता... बहरली सांज धुंद आहे
सुवास दरवळे चोहीकडे... फुलला तो निशिगंध आहे
माय परतली लगबगीने... अवघा संसार उभा आहे
बाळाला घेता कुशीत... फुटला तिचा पान्हा आहे
दिवस गेला सुखाचा... घामाच्या धारा शांत आहे
पाठ टेकता भिंतीला... मुलीच्या लग्नाचा क्रांत आहे
दोन घास भाकरीसाठी... प्राण मातीत झोकले आहे
सुखाची सांज विरली आता... अश्रुत वणवे पेटले आहे
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२