(शहीद वीरांना विनम्र श्रद्धांजली)
पुलवाम्यात घडवला
ना'पाक' भ्याड हल्ला
अवघ्या जगात माजवला
हाहाकार व कल्ला
मारले गेले सैनिक
भारतमातेचे बावन्न
कुठे आहे हो तुमची
छाती इंचाची छपन्न
CRPF चे जवान मारून
माजवला आगडोंब
दहशदवाद्यांचा उपडून काढा
मुळासकट अवघा कोंब
पाक ला आता शिकवा
ना 'पाक' धडा शेवटचा
बदला घ्या एका एका
शहीदाच्या रक्ताचा
नको आता आघाडी
युती वा महागठबंधन
करा सरळ युद्ध
शहिदांना तेच वंदन
भारत मातेच्या वीरपुत्रांना
देऊ सलामी शहिदांना
हमलेखोरांना कंठस्नान
नको पुन्हा पुन्हा पुलवामा
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372