"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

संकल्प नवीन वर्षात


नवीन वर्षाचे, हर्षोल्लात स्वागत
प्रयत्नांची पराकाष्ठा, होऊ प्रगत

जुन्याचे आभार, नवीनचा स्वीकार
आळस सोडुनी, प्रयत्नांवर स्वार

लक्ष्यात घ्यावी मैत्री, सुदामा-श्रीकृष्णाची
झिडकारून टाकावी, भाषा कुटणीतीची

वाईटाची होळी, यशवंतांची दिवाळी
मतमतांतरे सारून, अंतर्मन उजळी

हाताला काम, पोटाला भाकर
शेतकरी दादा, सुखासाठी जागर

सुखात नांदावा, कामगार मजूर
पांढरं सोनं शेतात, पिकावं भरपूर

निष्कलंक माणुसकी, कायम टिकावी
माय तर खात्रीने, मावशीही जगावी

करावा संकल्प, नवीन वर्षात
पेरावा आदर, प्रत्येक हृदयात

© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372