कुणी जातंय पुढे म्हणून
मनात त्यांच्या वाकडे आहे
पाय खेचण्यासाठी इथे
तयार नेहमी खेकडे आहे
समीक्षा करतात खेचून ताणून
प्रस्थापित ते समीक्षक आहे
शब्दांमध्ये गुंतवून सकलांना
त्यांच्यासाठी सर्व भक्षक आहे
वादाच्या खाईत अडकवून
पदाची लालसा रास्त आहे
काकणभर प्रसिद्धी साठी
बालिशपनच जास्त आहे
© कमलेश सोनकुसळे, काटोल
७५८८६९१३७२