"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

संवेदना





तुझ्यातून फुटणाऱ्या 
भावनेच्या लाटा,
माझ्या शब्दातून
झिरपू लागल्या,
तेव्हा आपण
जवळ आल्याचे,
प्रथम मला जाणवले.



पुढे,
तुझ्या सुख-दुःखाची चाहूल
मला माझ्या,
*संवेदनासारखी* वाटली,
आणि 
आपल्यातील संबंधावर
माझा विश्वास 
बसू लागला.



आता,
बरेच दिवस 
उलटून गेल्यावर,
आपण एकमेकांना 
पुन्हा शोधू लागलो,
आपल्यातील *संवेदनेचा*
शोध मात्र,
आजही संपलेला नाही.


© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372