"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

पाऊस



नेहमी माझा असावा
ओलाचिंब तो पाऊस,
हळूच ओठी वेचावा
गालावरचा टिपूस.

अधरांनाही न लागे
चुंबनाचा तो आभास,
अंतरी मग काहुर
बरसला तो पाऊस.

नखशिखांत भिजता
बावरला तो पाऊस,
मागावा आता नव्याने
प्रेमाचा क्षण कुणास ?

बरसुनी गेला आता
कधीचा वेडा पाऊस,
हुंकार देता तृप्तीचा
स्पर्शुनि तिच्या अंगास.

भिजलेले अंग तिचे
उधाण आले प्रितिस,
होऊन सरी नयनी
पुन्हा मागतो पाऊस.

(अष्टाक्षरी)

रचना
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com