ढग दादा
ढग दादा, ढग दादा
कोठून रे आलास तू
रूपानं तर गोरा गोरा
काळा कसा झालास तू
ढग दादा, ढग दादा
खूप पळून थकला का ?
उन्हात किती खेळाला
घामानं ओला झाला तू ?
ढग दादा, ढग दादा
खेळ छान भरपूर तू
कितीतरी दमलास ना
पाऊस मात्र पाड तू
ढग दादा, ढग दादा
आपली रे झाली दोस्ती
येशील तू लवकर
खूप करू आपण मस्ती
ढग दादा, ढग दादा
विसरू नको पाऊस तू
भिजण्याची रे आमची
पूर्ण कर ना हौस तू
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२