"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

करार

 करार


जीवनाशीच केला आता करार आहे

कोरोनाला  हरवण्याचा  विचार आहे


आयुष्याला  कवेत घेता  सुटला गुंता

आनंदाने   जगावयाचा   प्रकार आहे


दुःखानेही  सोडले प्राण  कितीदातरी

देही ऊर्जा जगावयाची  चिकार आहे


व्यापला जरी   कोरोनाने  देह अंतरी  

मृत्यूचा रे  अजून बाकी  नकार आहे


मोडून अता   आव्हानेही   जिंकूया रे

पालथून रे यशाचा घोट  पिणार आहे


शोधूया रे सुखात तुला  दुःखात मला

नात्याला रे सांधावयास किनार आहे


येऊन कशी वादळे शांत झाली आता

झाली पहाट पुढे सुखाची दुपार आहे


गझल : अनलज्वाला (८+८+८)

© कमलेश सोनकुसळे