साद शब्दांचा
पाऊस बरसून... गेला कधीचा
डोळ्यातून वाहिला... तो पूर आहे
नव्याने जगण्यास... साद घातली
शब्दांत मिसळला... तो सूर आहे
अमावस्येचा चंद्र... कुठे दडला
चेहऱ्यावर तिच्या... तो नूर आहे
विरहाचा मागोवा... किती काढावा
आठवणींचा गाव... तो दूर आहे
किती लावला जीव... तरी रे गड्या
हृदयातून निघाला... तो धूर आहे
लक्ष कुठे रे वेड्या... सांग ना बरे
कुठे तरी विधाता... तो चूर आहे
© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२