वाचत गेलो...
कळेना मज का जाहली गर्दी वस्तीत
तरी वाचत गेलो गर्दीतील माणसाला
सद्रक्षणाय... कुठे झाले रक्षण नाही
तरी वाचत गेलो वर्दीतील माणसाला
हास्याची लकेर माझ्याही मुखी नाही
तरी वाचत गेलो दर्दीतील माणसाला
रे झालेत वार डोळ्यादेखत पाठीवरी
तरी वाचत गेलो मर्जीतील माणसाला
© कमलेश सोनकुसळे