"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

शोध माणुसकीचा













रात्र वैऱ्याची आहे
प्रत्येक जण सांगतोय,
स्वार्थासाठी मित्रांवर
फैरी मात्र झाडतोय.

सुधारक बुद्धिवादी
अधर्मामुळे मिटतोय,
स्वभावाच्या वलयात
तोल लगेचच सूटतोय.

अबुद्धीच्या विळख्यात
पाण्यातच बघतोय,
कुपमंडूकाला विहिर
सदा विश्व वाटतोय.

जिकडे बघावं तिकडे
अफवांना पेव फुटतोय,
पदरातील यशाकडे
चातकासम बघतोय.

चिंध्या पांघरून आता
भलताच सोनं मागतोय,
पुरोगाम्यांनाही आता
जो तो औलिया वाटतोय.

कोरड्या वाळवंटात
सागर मंथन करतोय,
असहिष्णुतेच्या गर्दीत
माणुसकीला शोधतोय.

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372