हुंदका
घ्यावा कसा आता हा श्वास जरासा
हुंदक्यात निखळे आभास जरासा
तो क्षणही कसा थांबला तुजसवे
होतो रात्रीस मज हा भास जरासा
जीवनाचे रडगाणे गायिले सदा
दुःखाच्या क्षणालाही हास जरासा
माजवले तांडव विषाणूने जगती
मृत्यूचा अजून बाकी ऱ्हास जरासा
मुखवटा घालुनी काम तो करी
होता त्यात चेहरा खास जरासा
घामावर पिकवी कोरडी शेती
सैल सोड ना रे गळफास जरासा
मलाही दे देवा जन्म तो धान्याचा
व्हावा भुकेल्या तोंडी घास जरासा
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल ७५८८६९१३७२