"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

राज्यस्तरीय

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार 2018

पुणे शहरातील टिळक स्मारक सभागृहात दि. ८ सप्टेंबर २०१८ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी द्वारा आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव सत्कार सोहळा मोठ्या आनंदात पार पडला. महाराष्ट्रातील  विविध क्षेत्रांतील गुनिजण मानकऱ्यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल सुप्रसिद्ध किर्तनकार आणि ज्येष्ठ विचारवंत श्री. शामसुंदर सोन्नर महाराज यांचे हस्ते गुणिजन गौरव पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले.... 

या प्रसंगी *राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार 2018* मिळाल्याचा आनंद होतोय....

संस्थेचे अध्यक्ष  श्री कृष्णाजी जगदाळे यांनी संपूर्ण सोहळा नियमांचे काटेकोरपणे पालन करून अगदी आनंदाने पार पाडून उपस्थितांची मने जिंकली. या प्रसंगी राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकरत्न पुरस्कार 2018 मिळाल्याचा आनंद होतोय.... त्याबद्दल श्री जगदाळे सरांचे अभिनंदनीय आभार...!