"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

गगनभरारी

गगनभरारी

अपयश आले जरी
संकल्प जिवंत उरी
चंद्राला गाठण्यास
घेऊ गगन भरारी

आता नाही माघार
चढू यशाची पायरी
मनी उमंग भरुनी
घेऊ गगन भरारी

यशाला स्पर्शण्यास
भेदू अपयशाची पायरी
चंद्रावर पाऊल ठेवण्या
घेऊ गगन भरारी

अथांग अंतराळात
भारताची रे स्वारी
चंद्राच्या पलीकडे
घेऊ गगन भरारी

इसरोची किमया
बघेल दुनिया सारी
जगाच्या पलीकडे
घेऊ गगन भरारी

© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२