आवेग
टवाळखोरांना सदा दिवाळी
करावी नुसती टवाळी,
फाडावी कधीही चोळी
चुकवावी तिची पाळी....
यांच्या डोळ्यातली बाहुली
वळवळतेच कशी ?
अशा हरामखोरांना
जगण्याची संधी
भेटतेच तरी कशी ?
चारदा तर त्यांनीच
चुकवली स्वतःची पाळी,
काळ्या दगडावरची
रेघ होती काळी,
फक्त लाकडे तेवढे
जमा करायचे होते बाकी,
त्यांच्या शरीराची तर
पेटणारच होती होळी.....
सात वर्षानंतर
आला तो क्षण
वाजविण्यास टाळी,
पुन्हा एकदा
फाशी चुकवण्यास,
याचना केली त्यांनी
गाळले आसवे
लोळले जमिनीवरती,
कदाचित त्यांना
आठवत असेल 'ती'
त्यांना लटकवल्यावर
क्षमला जरा आवेग
आणि देशासकट
मायच्या चेहऱ्यावर
उमटली झळाळी.....
शेवटची विनंती देवा तुला
टाकलाच प्राण पुन्हा तिच्यात,
तर चालेल तिच्या डोक्यावर मोळी,
पण असले जीवन लिहू नको
निर्भयाच्या भाळी
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२