( कार्यशाळा)
♦️काव्यप्रकार : "रोही पंचाक्षरी "
दिनांक: ११/६/२०२१
(६/१०/२०२० पण शिकविले होते)
विषय: स्पर्श
♦️नियम✍️
🔸"रोही पंचाक्षरी" या काव्यप्रकारात प्रत्येक ओळीत पाच वर्ण/अक्षरे असतात. हा एक चारोळीचाच प्रकार आहे.. परंतु चारोळीचे नियम ह्या काव्यप्रकाराला लागू पडत नाहीत..ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण आहे..हे सदैव ध्यानात ठेवावे..
🔸यमक: पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधणे यामध्ये फारच आवश्यक आहे.
🔸अंत्यपूर्व स्वरयमक साधावे. ( उदा.गीता, सीता,माया,छाया,काया, काम,धाम, निष्काम,घाम वगेरे..)
🔸 तीसरी ओळ- ह्या काव्यप्रकारात तीसऱ्या ओळीला जास्त महत्त्व दिले आहे..ही ओळ विषयाला *समर्पक* पाहिजे..
*समर्पक* म्हणजे अनुरूप विषय,आशय महत्त्व समुपदेशन पाहून लिहावे.*
उदा.
(१)
स्पर्श
हा वात्सल्याचा
स्पर्श आईचा
अनुभव हा
स्वर्ग सुखाचा
(२)
देखणी परी
स्वप्न सुंदरी
सुंदर राणी
हि सोनं परी
(३)
मन रमले
मन फुलले
चारोळी मुळें
मन हर्षले
सौ.सुधा जाधव
*आपल्या लक्षात आता आले असेलच कि,तीसरी ओळ किती महत्त्वपूर्ण आहे.* त्याला पूरक अशीच चौथी ओळ घ्यावी. परंतु ह्या चारही ओळी एकमेकांना पूरक.. अर्थपूर्ण असाव्यात.
धन्यवाद 🙏
सौ.सुधा जाधव
कोल्हापूर.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁