🧚सराव कार्यशाळा 🧚
♦️मधूसिंधु ♦️
*मधुसिंधू* हा काव्यप्रकार सौ. माधुरी काकडे यांचा स्वनिर्मित काव्य प्रकार आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा* 🙏💐
नियम*
(५-६-६- ५ हा आकृतीबंध.)
🔸 पहिल्या कडव्यात एकूण २२ वर्ण/अक्षरे.
🔸अशी अनेक कडवी एका कवितेत असु शकतात.
♦️पहिल्या आणि चौथ्या चरणात/ओळीत स्वरयमक( ५ वर्ण)
♦️तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत स्वरयमक! (६वर्ण)
♦️तिसऱ्या व चौथ्या ओळींत विचारांची कलाटणी देण्याचा प्रयत्न केला तर रचनेचा गर्भितार्थ आणखी छान साधता येतो.
♦️यमकाआधीच्या अक्षराचे उच्चारयमक/स्वरयमक साधणे आवश्यक.
उदा.
विषय: जीवन-
जीवन गीत
गातच राहावे
हसत जगावे
रे मनमीत
सौ.सुधा जाधव
कोल्हापूर.
सर्वांना नविन काव्यप्रकारासाठी
शुभेच्छा 💐
सौ.सुधा जाधव
प्रशासक
शब्दवेड साहित्य समूह.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁