निकाल
मॅच संपली असली तरी
निकाल अजून बाकी आहे
कोणाची पडणार विकेट
कोण ठरणार लकी आहे
निकालाची धडधड सुरु
रात्र अजून बाकी आहे
स्ट्रॉंग झोनच्या परिसरात
लक्ष ठेऊन खाकी आहे
कोण पुढे अन् कोण मागे
शर्यत अजून बाकी आहे
निकाला अगोदर कोणाची
तयार झाली झाकी आहे ?
थर्ड अंपायरचा निकाल
यायचा अजून बाकी आहे
येऊन येऊन कोण येणार
जिंकणार लोकशाही आहे
© कमलेश तुकाराम सोनकुसळे