एक होती चिऊ...
सगळे मिळून गाणे गाऊ ||
एक होता काऊ...
आपण सारे खेळायला जाऊ ||
एक होती कोकिळा...
तिचा होता मधुर गळा ||
एक होता बगळा...
धडा वाचून झाला सगळा ||
एक होती घार...
खाण्याकडे लक्ष फार ||
एक होता सुतार...
कामामध्ये खूप हुशार ||
एक होता बदक...
धावा लवकर मिळवा पदक ||
एक होता पोपट...
डोकं त्याचं लय तापट ||
एक होती मैना...
आवाजाची झाली दैना ||
एक होती कोंबडी...
नाचत होती धरून तंगडी ||
एक होती बुलबुल...
शाळेमध्ये फार चुलबुल ||
एक होता मोर...
म्हणत होता लबाड पोर ||
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com