
तुला आठवतंय...
तुझ्या माझ्या पहिल्या भेटीची
चांदनी रात्र,
तू वचन दिलं होतं
या जन्मी होईल
तुझीच कलत्र...
तुला आठवतंय...
आपलं हातात हात घालून
यथेच्छ फिरणं,
वाट चुकल्यावर
तुझं नवीन वाट शोधणं...
तुला आठवतंय ...
गत मिलनात
पावसाची सर
बरसली होती,
नाही-नाही म्हणताच
तुझ्या हाताची बांगडी
टिचली होती...
तुला आठवतंय...
दिला होता मी
तुला शब्द,
ऐकून माझे वचन
झाली होती नि:शब्द...
तुला जाण होती
माझ्या कर्तृत्वाची,
स्वतःच घेतली मात्र
थाप कौतुकाची...
कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर