ताई बघ पाऊस आला
नजर चुकवून जाऊ
खेळून येऊ लवकर
होऊ मस्त ओलेचिंब
आपण जाऊ अंगणात
पावसासंगे बागडू गं
नाचू झिंग झिंग झिंगाट
कागदी होडी बनवून
चालवू या पाण्यामध्ये
एवढी सुंदर छोटी होडी
असेल का गं कुणाकडे
पाण्यातील होडीचा गं
होईल ना मीच नावाडी
कोणत्या दिशेने न्यावी
सांगेल का मला कुणी
पावसाच्या सरी सोबत
आईने दिला आवाज
कपडे जरी ओले पार
खुप्पच मजा आली आज
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२