"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

प्रित


फुलांनी फुलली
प्रित तुझी माझी
कधी सुरू नये
ओढ या फुलांची,
कळ्या उमललेल्या
फुलांच्या सोबती
कधी सुरू नये
प्रित या कळ्यांची.



गंधाने बहरली
प्रित तुझी माझी
कधी सुरू नये
ओढ या गंधाची,
पाऊस बरसला
धरणीच्या सोबती
कधी सुरू नये
प्रित या पावसाची.



विश्वात खुलली
प्रित तुझी माझी
कधी सुरू नये
ओढ या विश्वाची,
जगती जमली
जोडी तुझी माझी
कधी सुरू नये
प्रित या जगाची.




कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372

kamlesh1029@gmail.com