बाप माझा कास्तकार
साऱ्या जगाचा पोशिंदा, बाप माझा कास्तकार
त्याचाच घाम देतो, सर्व जगाला आकार
करून काबाडकष्ट, पै पै लावितो शेतीला
पिकून होऊ दे सर्व, स्वप्न त्याचे साकार
ठेव माझ्या बापाला, सुखी हे धरणी माता
तुझ्यातुनी पिकवी मोती, जगती त्याचे उपकार
ती जीवघेणी शांतता, अन् ते ओसाड रस्ते
सुन्न कर्फ्युतही घेतो, बाप माझा पुढाकार
नुसते कृषिप्रधान सोडा, निसर्गही कोपतो भारी
आतातरी लक्ष द्या हो, शेतकऱ्याकडे सरकार
नाही ऊन ना पाऊस, ना कोरोनाची भीती
'बा'च्या याच कष्टाला, कोटी कोटी नमस्कार
© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372