"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

वैताग

 वैताग


विषाणूचा फैलाव थांबेल  असं वाटत नाही 

कोरोना जगातून संपेल    असं वाटत नाही 


करू नका गर्दी अन् जाऊ नका समारंभाला 

कुणाशिवाय  लग्न थांबेल  असं वाटत नाही


विषाची परीक्षा घ्यावी कशाला संत म्हणाले 

बाहेर न पडल्यास बिघडेल असं वाटत नाही 


कोरोनामुळे  गेलीत   सोन्यासारखी  माणसे 

ही पोकळी कधीतरी भरेल असं वाटत नाही 


वैताग आला आता   कोरोनासवे  जगण्याचा 

त्याच्यासोबत माणूस जगेल असं वाटत नाही 


घामाभरला अर्धा पाव  आता तोही मिळेना 

पांढरे बगळे  मदत करेल  असं वाटत नाही 


गरिबांचा लॉकडाऊन सातजन्म सरता सरेना 

जगण्यासाठी भाकर मिळेल असं वाटत नाही


© कमलेश सोनकुसळे, काटोल