"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

शुक्रतारा




प्रेम मिळे प्रेमाला
नाचे सागर किनारा,
प्रीत-पुष्प उमलण्या 
लुकलुकतो शुक्रतारा



श्वास मिळे श्वासाला
फुले मनी पिसारा,
भावना जाणावया
लुकलुकतो शुक्रतारा



शब्द मिळे शब्दाला
उमले काव्य धारा,
कवन जन्मावया
लुकलुकतो शुक्रतारा



जीव लागे जीवाला
उजळे आसमंत तारा,
जीवन जगावया
लुकलुकतो शुक्रतारा



© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर
7588691372