"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

मरण

मरण

इतुकेच मला जाताना, सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

रसिक हो, नमस्कार
सुरेश भटांच्या या ओळीसह मी कमलेश सोनकुसळे आपले इथे स्वागत करतो
आयुष्याबद्दल बरंच काही बोलून जाणारी माझी कविता..... मरण

एवढंच की आज, मी निपचित झोपलो होतो
आज मात्र चौघांच्या खांद्यावर, दूर चाललो होतो

बरं झालं मित्रा, आज मला मरण आलं
जिवंतपणी मात्र, जगण्यानेच खूप छळलं
प्रत्येकजण मला, चांगलं म्हणताना, ऐकत होतो
आज मात्र चौघांच्या खांद्यावर, दूर चाललो होतो

धावत राहिलो, दाही दिशा, एकट्या पावलाने
आज मात्र सर्व चालले, माझ्यासोबत, एकाच दिशेने
कर्तव्याचे ओझे उचलण्यात, पार गळून गेलो होतो
आज मात्र चौघांच्या खांद्यावर, दूर चाललो होतो

आधी करायचो मदत, कुणा पुस्तक, कुणा कपडा
आज मात्र माझ्या नशिबी, करकरीत, रंग पांढरा
अनेकदा उपाशीच - २, झोपावं लागलं होतं
आज मात्र चौघांच्या खांद्यावर, दूर चाललो होतो

सरणावर मी, माथ्यावर एक रुपया होता
अश्रू सर्वांच्याच डोळ्यांत, प्रत्येकजण पाया पडत होता
मीही आज - २, लाकडांवर, शांत झोपलो होतो
आज मात्र चौघांच्या खांद्यावर, दूर चाललो होतो

आयुष्य गेलं सारं, सुखाचा चंद्र शोधण्यात
क्षणाक्षणाला मरत होतो, मी उभ्या आयुष्यात
रात्रभर मी स्मशानात, एकटाच जळत होतो
आज मात्र चौघांच्या खांद्यावर, दूर चाललो होतो

शेवटी काय तर, मला एवढंच कळलं होतं
दूरच्या प्रवासाला मी, एकटाच चाललो होतो - २

कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२
kavya1029.blogspot.com