ऊन पावसाच्या खेळामध्ये
रिमझिम पाऊस पडतांना
मन चिंब चिंब भिजायचे
एकांतातील भेटीचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
चंद्र सूर्याच्या साक्षीने
तुझ्या बाहुपाशात जगतांना
हास्याची लकेर उमटायची
गालावरील हास्याचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
गाठी भेटीच्या ऋतूमध्ये
वाऱ्याची झुळूक वाहतांना
अंग शहारून जायचे
थरथरणाऱ्या बोलाचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
सुख दुःखाच्या वाटेवर
भावनेच्या सागरात डूबतांना
पापणी ओली व्हायची
ओथंबणाऱ्या अश्रुंचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
दिवस रात्रीच्या लपंडावामध्ये
एरव्ही एकांतात असतांना
तुझी आठवण यायची
कातरवेळच्या आठवणीचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
© कमलेश तु, सोनकुसळे काटोल, नागपूर 7588691372
www.kavya1029.blogapot.com
रिमझिम पाऊस पडतांना
मन चिंब चिंब भिजायचे
एकांतातील भेटीचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
चंद्र सूर्याच्या साक्षीने
तुझ्या बाहुपाशात जगतांना
हास्याची लकेर उमटायची
गालावरील हास्याचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
गाठी भेटीच्या ऋतूमध्ये
वाऱ्याची झुळूक वाहतांना
अंग शहारून जायचे
थरथरणाऱ्या बोलाचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
सुख दुःखाच्या वाटेवर
भावनेच्या सागरात डूबतांना
पापणी ओली व्हायची
ओथंबणाऱ्या अश्रुंचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
दिवस रात्रीच्या लपंडावामध्ये
एरव्ही एकांतात असतांना
तुझी आठवण यायची
कातरवेळच्या आठवणीचे
सुखाचे क्षण ते, मला परत दे
© कमलेश तु, सोनकुसळे काटोल, नागपूर 7588691372
www.kavya1029.blogapot.com