"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

गारवा ()



गारवा

पहाटेच्या वाऱ्यास मिलनाची आस
पात्यावरचे दवं अलगद समजावी
मज वाटे गारवा हा.. झुळूक येता
सुगंधित होऊनी सकाळ बहरावी

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर ७५८८६९१३७२




गारवा

गारवा व तुझ्या आठवणीने
अंग माझं शहारून जातंय
नजरेसमोर नसून सुद्धा
अस्तित्व मात्र जाणवतंय

© कमलेश सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372




 गारवा

तू असताना जवळी
मज गारवा वेडावतो...
सखे, विणेची तार छेडीता
वाराही गाणे गातो...

© कमलेश सोनकुसळे




 गारवा

संध्याकाळचा गारवा
पुन्हा पुन्हा खुणावतो
तू नसून सुद्धा क्षणात
आठवणीत पाठवतो

© कमलेश सोनकुसळे




गारवा

गारवा म्हटला की
फक्त तुझी आठवण
आपुल्या मिलनाची
पुन्हा तिच साठवण

© कमलेश सोनकुसळे




  गारवा

क्षणाचा गारवा
थंडीचा गोडवा
भुरळ पाडे मना
प्राजक्ताचा सडा

© कमलेश सोनकुसळे