"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

षडाक्षरी


             *षडाक्षरी*

             

काव्यप्रकार: *षडाक्षरी*

दिनांक- १८/६/२०२१


 षडाक्षरी हा एक छंद आहे. 

 खुपचं सोपा आहे हा..प्रणू चाराक्षरी सारखाच..

 फक्त यात चार अक्षरांऐवजी प्रत्येक ओळीत सहा अक्षरे/वर्ण असतात. 


या छंदात *एका ओळीत सहा अक्षरे* असतात आणि *तीन - तीन अक्षरांचे दोन गण* असतात. 


*नियम* 

१. एका ओळीत सहा अक्षरे

२. दुसर्‍या आणि चौथ्या ओळींत  यमक साधायचे. स्वरयमक साधावे.

३. व्याकरण आणि लय बरोबर असली कि छान वाटते षडाक्षरी..चालीत म्हणता येते..


उदाहरणार्थ:


विषय: स्पर्श

(षडाक्षरी)


गारवा गुलाबी

बेधुंद करतो

अलवार स्पर्श

मज सुखावतो..


प्रितीचा गारवा

हवासा वाटतो

मना-मनाला तो

बहु तोषवीतो


सौ.सुधा जाधव

कोल्हापूर.


उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा 💐


सौ.सुधा जाधव

प्रशासक

(शब्दवेड साहित्य समूह.)


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁