
मला माहित आहे
तू भेटायला नक्की येशील
अशी अचानक येऊन
माझ्या समोर उभी राहशील
जवळ येऊन सुद्धा
तशीच गप्प बसशील
स्पर्शांकित बैस म्हटल्यावर
तू नक्की नकार देशील
मग अचानक सुरु होईल
एका मागून एक सर् पावसाची
मग हळूच आठवण होईल
आपल्या पहिल्या भेटीची
तेव्हा सुरु होईल स्पंदने
जोराने दोघांच्या हृदयाची
शेवटी नकार असल्यावर सुद्धा
गोष्ट ऐकावी लागेल मनाची
तल्लीन होशील तू
अंगावरील पावसाच्या सरीने एका
तेव्हा तू विचारशील
हीच काय अपुल्या प्रेमाची याचिका ?
तृप्तीचा हुंकार देऊन
स्वतःच म्हणशील तू माझी प्रेमिका
तृप्तीचा हुंकार देऊन
स्वतःच म्हणशील तू माझी प्रेमिका
खर्र्रच सुमधुर असेल ती
जगावेगळी पावसाची एक तासिका