अक्षय तृतीया
असाधारण ठेवा मनुष्या लाभला
पितरांसाठी तो भक्तीतूनी दिधला
क्षणाक्षणाला संत वचन पाळले
सत्कर्म करुनी देव त्यासी भेटला
यज्ञ केला ; नारायण संग लक्षुमी
सुखी संसाराचा मार्ग त्यासी लाभला
तृष्णा कसली रे ही ज्ञानाची बघ ना
"पारायणी" ज्ञानदेव सुखी जाहला
ती "माऊली" सदा हृदयात बैसली
विश्व कल्याणास्तव त्या ठायी भासला
याद केली भक्तीभावाने "बाप" तुझी
दोन घासाशिवाय काही नको मजला
© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल ७५८८६९१३७२