"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

संघर्ष

संघर्ष

लगावली 

गा ल ल गा गा गा गा गा ल ल गा ल गा गा 


कुस्करली स्वप्ने सारी म्हटले असावे 

नाव तसे साधे माझे कटले असावे 


शब्द जरी गझलेचे आले हेच ओठी 

काय सांगावे शब्दाला; झटले असावे 


संघर्ष हा रस्ता दाखवतो मुखवट्यांचा 

कष्टविना निर्णय त्यांना पटले असावे 


ही तर झाली वाऱ्याचीच दिशा बदलणे 

व्याकुळ होऊन जगणे हटले असावे 


तो दिसला घाट अता शिल्पे कोरण्याचा 

कर्तुत्व करुनी हे सारे नटले असावे 


शोध नसे याचाही गोंधळ हा मनी रे

भाव अबोल भरवशाचे घटले असावे


कमलेश सोनकुसळे, काटोल

16/11/2025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा