"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

ए आय

 ए आय


ए आय झाला आता, परवलीचा शब्द

ऐकून तंत्रज्ञान वाणी, सारे झाले स्तब्ध


बुद्धीमत्तेची माया, जगी पसरली काया 

जेमिनी, चॅटजीपीटीसाठी, सारे बघा लुब्ध


आंतर-जालात गुंतले, इथे विहंग सारे

हे आले तरी कुठून? मी झालो निःशब्द


जग आले जवळी, वाढली कृत्रिमतेची गोडी

कोण जाणे कसले अन् काय हे प्रारब्ध ?


शोधावे या जगाला, कवेत घेऊन आता

ज्ञानाचे भंडार उघडावे, मन झाले क्षुब्ध


© कमलेश सोनकुसळे काटोल 

७५८८६९१३७२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा