गझल - मिर्झा एक्सप्रेस
लगावली -
गा ल गा गा गा गा गा गा गा गा गा ल गा
मी नव्याने तीच कहानी ऐकवली इथे
हास्य सम्राटाने गाडी थांबवली इथे
हा प्रवास क्षणांचा संयमाने झाला जरी
हास्य मैफिल सर्वांसाठी गाजवली इथे
भार हिरवा आणिक भगवा रंगांचा असे
नाळ हिंदू मुस्लिम त्यांनी वाचवली इथे
शब्द जांगडगुत्ता खास परवलीचा असे
जिंदगी ही रसिकांसाठी घालवली इथे
हुंदके झाले रे आर्त बोले अलविदा
एक्सप्रेस खरी मिर्झांनी चालवली इथे
कमलेश सोनकुसळे, काटोल
7588691372
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा