श्री विनोद शेंडगे (परभणी)
मुख्य प्रवर्तक : अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र.... यांना शुभेच्छा
दि.27/10/2025
*एक प्रवास...*
एक प्रवास सायकलचा
एक प्रवास पुस्तक वाचनाचा
शून्यातून जगशील्प निर्मितीचा
मस्तक व मनगट मजबूत प्रेरणेचा
एक प्रवास प्रयत्नांचा
एक प्रवास वाचन संस्कृतीचा
ध्यास खडतर जीवन वाटेवरचा
माणसामधला माणूस शोधण्याचा
एक प्रवास आवडीचा
एक प्रवास आत्मिक आनंदाचा
अंधार तुडवून वादळ वाऱ्याचा
वाचन संस्कृती मनात रुजविण्याचा
एक प्रवास परिवर्तनाचा
एक प्रवास आत्मचिंतनाचा
निरंतर वाचन परमार्थ साधण्याचा
कुशल बुद्धिजीवी मानव घडवण्याचा
एक प्रवास ध्येयाचा
एक प्रवास दिव्य साधनेचा
संकल्प करावा सहकुटुंब वाचनाचा
फुलावा मळा अक्षर आनंद वाचनाचा
@ कमलेश सोनकुसळे, काटोल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा