"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

२२ जून २०१८

येशील तू कधी ?

दूर तुझ्यापासून
इथे मी जरी
काळीज झोकिले
फक्त तुझ्यावरी

कधी असते अंतरी
कधी अधांतरी
आणि कधी असते
माझ्या जवळी

विरहाने घेतली
जागा मिलनाची
हृदयात गर्दी
तुझ्या आठवणींची

आठवणी असतात
अवती अन भोवती
प्रणयक्षण बनतात
क्षणिक सोबती

नयन एकटक
वाटेकडे बघती
पारणे फेडण्यास
येशील तू कधी ?

रचना
कमलेश सोनकुसळे
काटोल. नागपूर
7588691372
kavya1029.blogspot.com 

हृदय माझे


दवबिंदू पडती झाडांवरी
बेसावध होतो दूर कुरणावारी
पडती धुके सर्वत्र जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

कुठेतरी पडतात पावसाच्या सरी
बेसावध होतो दूर शेतावरी
जोराने वाहतो वारा जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

आकाश टेकते क्षितिजावरी
बेसावध होतो दूर कुठेतरी
आभाळाशी दाटती मेघ जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

काळोख चहुकडे धरतीवरी
चांदण्यांची मिळते साथ तरी
गगनी विधू एकटा जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

© कमलेश सोनकुसळे
काटोल. नागपूर
7588691372
kavya1029.blogspot.com

सुटीतील मौज



मामाच्या गावा
झटकन  जाऊ,
कुल्फी, टरबूज
मजेने खाऊ.



रोजच्या रोज
लिंबू पाणी,
छान बनवते
इंदू मामी.



फळांचा राजा
आंबा खाऊ,
मामा सोबत
लस्सी पिऊ.



खेळायची असते
मज्जाच भारी,
सखे सोबती
बातच न्यारी.



मामा सोबत
शेतात जाऊ,
संत्री मोसंबी
पोटभर खाऊ.



सुट्या संपल्या
परत येऊ,
पहिल्याच दिवशी
शाळेत जाऊ.



© कमलेश तु. सोनकुसळे

काटोल, नागपूर 7588691372

कार्टून धमाल


टॉम अँड जेरीची 
मस्ती लय भारी 
इकडून तिकडे 
मारतात फेरी 

शिवा म्हणतो बच्चा 
नही कहना अंकल 
सोबतीला असते 
नेहमीच सायकल 

प्रिन्सिपॉल है हम 
राठी कि जुबानी 
बुद्ध आणि बद्री 
नाही कुठेच कमी 

छोट्या भीमची 
बातच न्यारी 
कालियाची असते 
नेमकी हुशारी 

आता माझी सटकली 
म्हणत लिटिल सिंघम 
जंगली जोकरला करतो
भुईसपाट एकदम 

कुरखोडी करतो 
नेहमीच जियॉन 
सिझुका व नोबीताला 
वाचवतो डोरेमॉन 

मोटू आणि पतलू
हुशार अगदीच 
मैं हूँ डॉनला
नमवतात नेहमीच 

मायटी राजू 
अप टू डेट 
विमानाने पोहचतो 
कुठेही थेट 


© कमलेश तुकारामजी सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com

पक्ष्यांची शाळा

एक होती चिऊ...
सगळे मिळून गाणे गाऊ ||

एक होता काऊ...
आपण सारे खेळायला जाऊ ||


एक होती कोकिळा...

तिचा होता मधुर गळा ||


एक होता बगळा...

धडा वाचून झाला सगळा ||


एक होती घार...

खाण्याकडे लक्ष फार ||


एक होता सुतार...

कामामध्ये खूप हुशार ||


एक होता बदक...

धावा लवकर मिळवा पदक ||


एक होता पोपट...

डोकं त्याचं लय तापट ||


एक होती मैना...

आवाजाची झाली दैना ||


एक होती कोंबडी...

नाचत होती धरून तंगडी ||


एक होती बुलबुल...

शाळेमध्ये फार चुलबुल ||


एक होता मोर...

म्हणत होता लबाड पोर ||


© कमलेश तुकाराम सोनकुसळे

काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com

२१ जून २०१८

अध्यात्म जगती अमर....


( स्व. भय्यूजी महाराजांना विनम्र अभिवादन )

जगाला देऊनी शिकवण
शिकवण प्रेम व अध्यात्माचे,
का संपवावे अवघे जीवन
जीवन मंत्र सुखी जगण्याचे....

समाज-मनाला तारुणी तुम्ही
तुम्ही दिला सकलांना कानमंत्र,
अवघ्या संसाराने अनुभवले
अनुभवले सुखी जगण्याचे तंत्र....

अध्यात्माने कितीतरी संसार
संसार न मोडता एकवटले,
डोळीवरचे अफाट तणाव
तणाव क्षणार्धात मिटवले....

दुवा होऊनी अध्यात्माचा जगती
जगती जाहला सुखी संसार,
पंचतत्वात तुम्ही गेले सोडुनी  
सोडुनी अध्यात्माचा विचार....

भय्यूजी गेले सोडुनी जनमाणूस
जनमाणूस ओथंबला सागर,
तणावमुक्त करती अध्यात्म
अध्यात्म या जगती अमर....
अध्यात्म या जगती अमर....


© कमलेश तुकाराम सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
दि. 13/06/2018

१९ जून २०१८

शब्द अंतरीचे

कळेना आता फुलास,
दरवळणारा गंध
मातीचा असे सुवास.

बेभान होऊन वारा
झोंबतो तन मनास,
व्याकुळलेला गारवा
घालतो साद प्रेमास.

घालता फुंकर वारा
वेडावूनी त्या मनास,
मिठीत घ्यावे तुजला
हृदयातल्या सुखास.

जीवन वाट अपुली
सुखद हा सहवास,
शब्द तुझे अंतरीचे
कळावे सदा मनास.

(अष्टाक्षरी)

© कमलेश तु. सोनकुसळे
काटोल, नागपूर 7588691372
kamlesh1029@gmail.com

मायबोली कवन



जेव्हा 'मराठीचे'चे शब्द
 

पडती माझ्या अंतरात,
तळमळ होते काळजात
सळसळ होते देहात

शृंगारिक काव्यात

सूर्य-तारे  दिवस रात्र,
विधुसंगे अवतरे
शब्दरूपी कलत्र

आतुरते श्रावणात

बरसण्यास गगन,
जाग्या होतात स्मृती
वाहतांनी पवन

बहरलेल्या बागेत
अगणित भाव-क्षण,
नाजूक फुलासंगे
फुलपाखरांचे औक्षवण

भावनेशी जुळे

संवेदनशील मन,
उदयास येती तेव्हा
मायबोली कवन

© कमलेश सोनकुसळे

      काटोल, नागपूर
      7588691372