"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

१९ जून २०१८

मायबोली कवन



जेव्हा 'मराठीचे'चे शब्द
 

पडती माझ्या अंतरात,
तळमळ होते काळजात
सळसळ होते देहात

शृंगारिक काव्यात

सूर्य-तारे  दिवस रात्र,
विधुसंगे अवतरे
शब्दरूपी कलत्र

आतुरते श्रावणात

बरसण्यास गगन,
जाग्या होतात स्मृती
वाहतांनी पवन

बहरलेल्या बागेत
अगणित भाव-क्षण,
नाजूक फुलासंगे
फुलपाखरांचे औक्षवण

भावनेशी जुळे

संवेदनशील मन,
उदयास येती तेव्हा
मायबोली कवन

© कमलेश सोनकुसळे

      काटोल, नागपूर
      7588691372

२२ मे २०१८

दिल्या घरी तू सुखी रहा

गेले बालपण हसत खिदळत,
स्वप्न आता तू सासरचे पहा,
माहेरच्यांची तुला चिंता नको,
मुली, दिल्या घरी तू सुखी रहा.

दिले तुला नवख्या घरी,
हो त्या घरची तू पार्थ,
सासरच्या नात्याला जपुनी,
सोड स्वतः माहेरच्यांचा स्वार्थ.


नाते फार महत्वाचे संसारी,
सासू सासरे दीर नणंद जाऊ,
तुझ्या लाडक्यांना भरवतील घास,
अवतरेल दारी चिऊ अन काऊ.

आई होण्याचे सुखद स्वप्न,
तुलाही जीवनात लाभू दे,
जडणघडणीचे अतूट संस्कार,
तुझ्या मुलांबाळांवर होऊ दे.


चार भिंती सुखी संसारी,
घराचे घरपण राखुनी दारी,
प्रगतीचे ठेऊनी भाव अंतरी,
पिल्लांची बघ तू उंच भरारी.


चालव सुखी संसाराचा गाडा,
होऊन दोन घराण्यातील दुवा,
संस्काराचा मंत्र प्रत्येका देऊन,
सदा वाटावा सकलांना हेवा.


© कमलेश तु. सोनकुसळे

काटोल, नागपूर 7588691372