"शब्द अंतरीचे" काव्य blog वर आपले सस्नेह स्वागत

ब्लॉगवरील काव्य copyright आहे. त्याचा दुरुपयोग करू नये.

२२ जून २०१८

येशील तू कधी ?

दूर तुझ्यापासून
इथे मी जरी
काळीज झोकिले
फक्त तुझ्यावरी

कधी असते अंतरी
कधी अधांतरी
आणि कधी असते
माझ्या जवळी

विरहाने घेतली
जागा मिलनाची
हृदयात गर्दी
तुझ्या आठवणींची

आठवणी असतात
अवती अन भोवती
प्रणयक्षण बनतात
क्षणिक सोबती

नयन एकटक
वाटेकडे बघती
पारणे फेडण्यास
येशील तू कधी ?

रचना
कमलेश सोनकुसळे
काटोल. नागपूर
7588691372
kavya1029.blogspot.com 

हृदय माझे


दवबिंदू पडती झाडांवरी
बेसावध होतो दूर कुरणावारी
पडती धुके सर्वत्र जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

कुठेतरी पडतात पावसाच्या सरी
बेसावध होतो दूर शेतावरी
जोराने वाहतो वारा जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

आकाश टेकते क्षितिजावरी
बेसावध होतो दूर कुठेतरी
आभाळाशी दाटती मेघ जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

काळोख चहुकडे धरतीवरी
चांदण्यांची मिळते साथ तरी
गगनी विधू एकटा जरी
हृदय माझे उमलते फुलापरी

© कमलेश सोनकुसळे
काटोल. नागपूर
7588691372
kavya1029.blogspot.com